उत्तर प्रदेश : हरयाणा, पंजाब, उत्तराखंडसह राजस्थानमध्ये उसाच्या बिस्मिल वाणाला लागवडीस मंजुरी

शहाजहांपूर : उत्तर प्रदेश ऊस संशोधन परिषदेच्या शाहजहांपूर विभागाने विकसित केलेल्या ‘बिस्मिल’ या उसाच्या नवीन वाणाला आणखी चार राज्यांमध्ये लागवडीस मंजुरी देण्यात आली आहे. आता या ऊस वाणाची लागवड हरियाणा, पंजाब, उत्तराखंड आणि राजस्थानमध्ये केली जाऊ शकते. केंद्रीय समितीने यास मंजुरी दिली आहे, अशी माहिती ऊस संशोधन परिषदेचे संचालक व्ही. के. शुक्ला यांनी दिली. याआधी केवळ उत्तर प्रदेशमध्ये लागवडीसाठी हे वाण प्रसारित करण्यात आले होते. हे नवीन वाण उच्च उत्पादन देणारे आहे. या नवीन वाणामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न लक्षणीयरीत्या वाढण्यास मदत होईल आणि साखर उत्पादनही वाढेल, असा दावा तज्ज्ञांनी केला आहे.

भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (आयसीएआर) अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्पाअंतर्गत हे ऊस वाण विकसित करण्यात आले आहे. या वाणाला अधिकृतपणे ‘कोशा’ (कोइम्बतूर-शाहजहांपूर कोशा १७२३१) असे नामकरण करण्यात आले आहे. ऊस पिकाचा कर्दनकाळ ठरलेल्या लाल कूज (रेड रॉट) रोगासाठी हे वाण प्रतिरोधक आहे. या वाणाची सरासरी उत्पादन क्षमता प्रतिहेक्टर ८६.३५ टन एवढी आहे. तर साखर उतारा १३.९७ टक्के असल्याचे सांगण्यात आले आहे. याआधी केवळ उत्तर प्रदेशमध्ये लागवडीसाठी हे वाण प्रसारित करण्यात आले होते. ऊस वाणाचे बेणे आणि रोपे उत्तर प्रदेशच्या ऊसपट्ट्यातील सर्व ४२ जिल्ह्यांमध्ये आधीच वितरित करण्यात आली आहेत. त्याचे परिणाम चांगले दिसून आले असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here