देशातील साखर उत्पादनात यंदा उत्तर प्रदेशच अव्वल स्थानावर, महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर

पुणे / लखनौ : यंदाच्या हंगामात एप्रिलअखेर उत्तर प्रदेश ने 92 लाख टन साखर उत्पादन करीत देशात पहिल्या क्रमांकावर आहे. उत्तर प्रदेशमध्ये अजून 11 कारखाने सुरू असल्याने उत्पादनात आणखी वाढ होवू शकते. तर महाराष्ट्रात एप्रिलअखेर 81 लाख टन साखर उत्पादित झाली आहे, अशी माहिती राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने दिली आहे. महाराष्ट्रात सद्यस्थितीत एकच कारखाना सुरू आहे. कर्नाटक राज्य केवळ 40 लाख टन साखर उत्पादित करून तिसऱ्या क्रमांकावर आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा साखर उत्पादनात तिन्ही राज्ये उत्पादनाच्या दृष्टीने मागे पडली आहेत. तमिळनाडूत 7 कारखान्यांचा हंगाम सुरू आहे.

गेल्यावर्षी महाराष्ट्र 108 लाख टन साखर तयार करीत अव्वल स्थानावर होता. त्या खालोखाल उत्तर प्रदेशमध्ये 103 लाख टन साखर तयार झाली होती. कर्नाटकात 51 लाख टन साखर तयार झाली होती. यंदा हंगामाच्या अखेरीस देशातील एकूण साखर उत्पादन 261 लाख टन होण्याचा अंदाज आहे. याव्यतिरिक्त, इथेनॉल उत्पादनासाठी सुमारे 32 लाख टन साखर वळवण्याची अपेक्षा आहे. सद्यस्थितीत देशात 30 एप्रिलअखेर, एकूण 2758.57 लाख टन ऊस गाळप करण्यात आला आहे. यातून 256.95 लाख टन साखर उत्पादन झाले आहे. गेल्या हंगामात याच कालावधीत 3115.12 लाख टन ऊस गाळप झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here