उत्तर प्रदेश : ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी युनिक कोड, फसवणुकीला बसणार आळा

महाराजगंज : शेतकरी असल्याचे भासवून कवडीमोल किमतीत ऊस खरेदी करून तो ऊस कारखान्यांना जादा दरात विकून कमाई करणाऱ्या टोळ्यांवर कारवाई करण्यासाठी प्रशासनाने तयारी केली आहे. आगामी गाळप हंगामात साखर कारखान्यांमध्ये फक्त युनिक कोड असलेले शेतकरीच उसाचे वजन करू शकतील. युनिक कोडच्या मदतीने शेतकऱ्यांच्या मोबाईलवर एसएमएसद्वारे स्लिप पोहोचतील आणि केंद्रांवर ऊसाचे वजन केले जाईल. आगामी गाळप हंगामाच्या पार्श्वभूमीवर, सिसवा, थुथीबारी, घुघली, निचलौल आणि गडौरा परिसरातील एक लाख ३५ हजार शेतकऱ्यांना युनिक कोड जारी करण्यात आला आहे.

आगामी गाळप हंगामात उसाची बनावट खरेदी रोखण्यासाठी, ऊस आयुक्तांनी युनिक कोडद्वारेच ऊसाचे वजन करण्याचे निर्देश दिले आहेत. यासाठी, शेतकऱ्यांसाठी १६ अंकी युनिक कोड जारी करण्यात आला आहे. बनावट, मृत आणि युनिक कोड नसलेल्या शेतकऱ्यांना पकडण्यासाठी, नोंदणी मेळाव्यात अतिशय सखोल चौकशी केली जाईल, जेणेकरून लहान-मोठ्या त्रुटी दूर करता येतील. सद्यस्थितीत जिल्ह्यातील साखर कारखान्यांना ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या खूपच कमी असल्याचा अंदाज आहे. उसाचे गाळप सुरू झाल्यावर, स्लिपचा एसएमएस युनिक कोड असलेल्या शेतकऱ्यांच्या मोबाईलवर पोहोचेल. सप्टेंबर महिन्यात ऊस समित्यांद्वारे सुरू होणाऱ्या नोंदणी प्रात्यक्षिक मेळाव्यात मृत शेतकऱ्यांची ओळख पटवली जाईल. जमिनीचा प्लॉट क्रमांक आणि उसाचे क्षेत्रफळ जुळवून ऊस विभाग याची पडताळणी करेल. याबाबतची सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश ऊस विभागाला देण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here