ऋषिकेश : अखिल भारतीय किसान सभेचे सदस्य शुक्रवारी डोईवाला साखर कारखान्यात २०२५-२६ च्या गाळप हंगामाच्या उद्घाटनानिमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहिले. त्यांनी प्रादेशिक आमदार ब्रिजभूषण गायरोला आणि माजी मंत्री प्रेमचंद अग्रवाल यांच्यामार्फत ऊस मंत्री सौरभ बहुगुणा यांना निवेदन पाठवले. साखर कारखान्यांनी उसाचा दर जाहीर न केल्याबद्दल अखिल भारतीय किसान सभेने तीव्र नाराजी व्यक्त केली. उसाचा दर ५०० रुपये प्रती क्विंटल करण्याची मागणी त्यांनी या निवेदनातून केली आहे. उसाचा भाव जाहीर करण्यात विलंब होत आहे. कारखान्यांनी गाळप हंगाम सुरू होण्यापूर्वीच ऊसाचा भाव जाहीर करायला हवा होता असे किसान सभेचे प्रदेशाध्यक्ष सुरेंद्र सिंह सजवान यांनी सांगितले.
किसान सभेच्या सदस्यांनी सांगितले की, सरकार या मुद्यावर गप्प असल्याने ऊस उत्पादक शेतकरी संभ्रमात आहेत. शेतकऱ्यांच्या आर्थिक योजनांवर परिणाम होत आहे. उत्तर प्रदेश आणि हरियाणामध्ये उसाचा दर जाहीर करण्यात आला आहे. उत्तराखंडमध्ये दर जाहीर न करणे हा शेतकऱ्यांवर अन्याय आहे. जिल्हाध्यक्ष दलजित सिंह आणि जिल्हा सचिव कमरुद्दीन म्हणाले की, उसाचा दर प्रति क्विंटल ५०० रुपये निश्चित करावा, ऊस केंद्रांवर नियमित वजन करावे आणि वजनातील काटामारी थांबवावी. कृषी उपकरणांवर ५० टक्के सूट देण्याची मागणी त्यांनी केली. यावेळी शिवप्रसाद देवळी, राजेंद्र पुरोहित, बलवीर सिंह, याकूब अली आदी उपस्थित होते.

















