रुरकी : इकबालपूर साखर कारखान्याकडून उसाचे थकीत पैसे मिळावे या मागणीसाठी उत्तराखंड किसान मोर्चाच्या बॅनरखाली, शेतकरी उपविभागीय कार्यालयासमोर गेल्या अनेक काळापासून निदर्शने करीत आहेत. थकीत ऊस बिले मिळावाती यासाठी शेतकऱ्यांनी ९ ऑक्टोबर रोजी महापंचायतीचेही आयोजन केले आहे. जोपर्यंत आम्हाला पैसे मिळत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहिल असे शेतकऱ्यांनी सांगितले. गुरुवारीही आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी सरकार आणि साखर कारखाना व्यवस्थापनाविरुद्ध घोषणाबाजी सुरू ठेवली.
हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, उत्तराखंड किसान मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष गुलशन रोड यांनी सांगितले की, लोक दसरा सण साजरा करत आहेत. परंतु शेतकरी त्यांच्या हक्कांसाठी आंदोलन करण्यासाठी आपली शेती आणि घरे सोडून आले आहेत. सरकार इकबालपूर साखर कारखान्याकडून उसाचे पैसे मिळवून देण्यात पूर्णपणे अकार्यक्षम असल्याचे सिद्ध होत आहे. सरकार शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याकडे दुर्लक्ष करीत आहे. एकीकडे, ऊस बिले थकीत असताना वीज महामंडळ सर्वसामान्य जनता आणि शेतकऱ्यांचे कनेक्शन तोडून त्रास देते. दुसरीकडे त्याच विभागातील कर्मचारी, अधिकारी वीज चोरी करत आहेत. शेतकऱ्यांना सर्व बाजूंनी त्रास दिला जात आहे. आम्ही ९ तारखेला होणाऱ्या महापंचायतीत भविष्यातील रणनीती ठरवू. यावेळी शेतकरी नेते समीर आलम, पवन प्रधान, राजपाल सिंग आणि अकील हसन आदी उपस्थित होते.