ऊस दरात वाढ करू न देणारे भाजपचे सरकार शेतकरी विरोधी आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांनी केली आहे. शुक्रवारी डेहराडूनमधून हरिद्वारला जाताना माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांनी डोईवाला येथील जीवनवाला येथील रस केंद्राला भेट दिली.
लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, ऊस केंद्रावर रस प्यायल्यानंतर माजी मुख्यमंत्री रावत यांनी तेथे व्हिडिओ तयार केला. ते म्हणाले की, सध्याच्या भाजप सरकारने शेतकऱ्यांची उपेक्षा केली आहे. जर काँग्रेसचे सरकार सत्तेवर आले की, ऊस दर वाढविण्यासह जे उपपदार्थ आहेत, त्यापासून गुळासह रस निर्मिती करणाऱ्या चरख्याचा समावेश आहे. त्यामुळे आम्ही ऊस स्टार्टअप प्रोत्साहन धोरण तयार करू. ते म्हणाले की, ऊस आमच्यासाठी खूप लाभदायक पिक आहे. उसाच्या रसापासून खूप आजार बरे होतात. डेहराडून, हरिद्वार, उधमसिंह नगर येथील शेतकऱ्यांसाठी ऊस ही ताकद आहे. त्यावरच आपली उपजीविका चालते.












