काशीपूर : येथील ऊस शेतकरी संस्था आणि प्रशिक्षण केंद्राच्या संयुक्त विद्यमाने बागुलिया गावात एक दिवसीय शेतकरी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. गाव प्रमुख रामधर बागुलिया यांनी शेतकरी चर्चासत्राचे अध्यक्षस्थान भूषविले. यावेळी शेतकऱ्यांना आधुनिक ऊस लागवडीची माहिती देण्यात आली.
यावेळी काशीपूर येथील ऊस संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. सिद्धार्थ कश्यप यांनी शेतकऱ्यांना उसाच्या नवीनतम आणि प्रगत जातींबद्दल माहिती दिली. शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त शास्रशुद्ध शेती करण्याकडे लक्ष द्यावे आणि नफा मिळवावा असे आवाहन त्यांनी केले. ऊस शेतीतील प्रगत तंत्राची माहिती यावेळी देण्यात आली. या शिबिराला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


















