‘विस्मा’तर्फे विविध पुरस्कारांची घोषणा, २१ ऑगस्ट रोजो पुणे येथे वितरण : अध्यक्ष बी. बी. ठोंबरे

पुणे : वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (विस्मा) राज्यातील १३३ खाजगी साखर कारखान्यांची शिखर संस्था असून महाराष्ट्रातील खाजगी साखर उद्योगातील विशेष व उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल निवडक सभासदांना ‘विस्मा’ सलग दुसऱ्या वर्षी पोरितोषक देवून सन्मानित करणार आहे. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राजस्थानचे राज्यपाल हरीभाऊ बागडे व राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील हे असतील. हा कार्यक्रम गुरुवारी (२१ ऑगस्ट) सकाळी ९.३० ते दुपारी २ वाजता सिध्दीसाज गार्डन, म्हात्रे पुलाजवळ, एरंडवणा, पुणे येथे होणार असल्याची माहिती ‘विस्मा’चे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

 

पत्रकात म्हटले आहे कि, कार्यक्रमाच्या सुरूवातीस साखर उदयोगाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या खालील विषयांवरील सादरीकरणे सादर केली जातील. त्यामध्ये,

 

१) भारतीय साखर उद्योगातील परिवर्तन आणि भविष्याचा मार्ग.

२) साखर आणि संबंधित उत्पादनांच्या निर्मिती आणि प्रक्रियेत कृत्रिम बुध्दीमत्ता (एआय) चा वापर,

३) हरित हायड्रोजन उत्पादन साखर उद्योगासाठी समृध्दीचे क्षितीज

 

यानंतर सालाबादप्रमाणे ‘विस्मा’ गाळप हंगाम २०२४-२५ करीता खालीलप्रमाणे पारितोषिके वितरण केले जाणार आहे.

 

१) सर्वोत्कृष्ट ऊस विकास – श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना लि. जिल्हा-पुणे.

 

२) सर्वोत्कृष्ट तांत्रिक व नविनतम कार्य- जयवंत शुगर्स लि. जिल्हा-सातारा

 

३) सर्वोत्कृष्ट जैवउर्जा व जैवइंधनामध्ये कार्य – श्री गुरूदत्त शुगर्स लि. जिल्हा-कोल्हापूर

 

४) सर्वोत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन – द्वारकाधिश साखर कारखाना लि. जिल्हा-नाशिन

 

५) सर्वोत्कृष्ट सामाजिक दायित्व -दालमिया भारत शुगर अॅण्ड इडस्ट्रिज लि. जिल्हा-कोल्हापूर

 

६) सर्वोत्कृष्ठ साखर कारखाना – नॅचरल शुगर अॅण्ड अलाईड इंडस्ट्रिज लि. जिल्हा-धाराशिव.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here