‘व्हीपीके व एमव्हीके’चा सिंधी व वाघलवाडा येथे बॉयलर अग्निप्रदीपन, गव्हाण पूजन कार्यक्रम संपन्न

नांदेड : उद्योजक मारोतराव कवळे गुरूजी यांनी उभारलेल्या उमरी तालुक्यातील व्हिपीके ॲग्रो फूड प्रॉ. प्रा ली प्रयागनगर सिंधी व डॉ. शंकरराव चव्हाण जागरी ॲग्रो कुसुमनगर वाघलवाडा या दोन्ही कारखान्याचा बॉयलर अग्निप्रदिपन व गव्हाण पूजनाचा सोहळा आज (दि. २२) सकाळी ९ वाजता मौ. सिंधी येथे तसेच डॉ. शंकरराव चव्हाण जागरी ॲग्रो कुसुमनगर वाघलवाडा या कारखान्याचे तृतीय बॉयलर अग्नी प्रदीपन व गव्हाण पूजन सकाळी ठीक ११ वाजता कुसुमनगर वाघलवाडा येथे झाला. शेतकऱ्यांनी येत्या हंगामात जास्तीत जास्त ऊस गाळपासाठी पाठवावा, असे आवाहन मारोतराव कवळे गुरुजी, सीईओ संदीप पाटील कवळे, परमेश्वर पाटील कवळे यांच्यासह सर्व संचालक, कार्यकारी मंडळ व्हीपीके उद्योग समूह व एमव्हीके उद्योग समुहाच्या वतीने करण्यात आले आहे.

याप्रसंगी प.पू.श्री. १००८ महंत रामभारती महाराज (श्रीक्षेत्र मोहनपुर), योगीराज बापू गुरू दत्ता बापू (श्री क्षेत्र उखळाई मंदीर हदगाव), बालयोगी देवपुरीज महाराज (श्री दत्त मंदीर कहाळा) आदी संत-महंतांसह आनंदराव शंकरराव पुयेड व त्यांच्या पत्नी, यशवंतराव व्यंकटराव कवळे, महंत यदुबन गुरू गंभिरबन महाराज (दत्त मठ संस्थान कोलंबी), सिद्धदयाळ शिवाचार्य महाराज (श्री क्षेत्र बेटमोगरा), अनंतपुरी गुरू दत्तपुरी महाराज (श्री दत्त संस्थान चोळाखा), आचार्य श्री बामेराज बाबा कपाटे (श्री दत्त संस्थान बिजेगाव), बाबुसिंग महाराज (पोहरादेवी), माधवराव दिगांबर इंद्रावा, भास्करराव माधवराव जाधव आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here