कोलकाता : राज्यात इथेनॉल उत्पादन प्लांट स्थापन करण्यासाठी २ हजार ६६६ कोटी रुपये गुंतवणूक करण्याचे जवळपास १५ प्रस्ताव दाखल झाले आहेत अशी माहिती पश्चिम बंगाल सरकारने दिली आहे. राज्याचे मुख्य सचिव हरिकृष्ण द्विवेदी यांनी उद्योगपतींसमवेत झालेल्या बैठकीनंतर ही घोषणा केली.
इंडियन एक्सप्रेस डॉट कॉममध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, द्विवेदी यांनी सांगितले की, देशातील सर्वात जास्त तांदूळ उत्पादक राज्यांमध्ये पश्चिम बंगालचा समावेश आहे. खराब, तुटलेल्या तांदळाचा वापर इथेनॉलची निर्मिती करण्यासाठी केला जाऊ शकतो. इथेनॉल हे एक हरित इंधन आहे. त्यासाठी पेट्रोल आणि डिझेलमध्ये इथेनॉलचे मिश्रण करणे हे अनिवार्य करण्यात आले आहे. आमच्याकडे मोठ्या प्रमाणावर तुटलेला तांदुळ आहे. आम्हाला अपेक्षा आहे की मोठ्या प्रमाणावर इथेनॉल उत्पादन करण्यासाठी आम्ही सक्षम राहू.
ते म्हणाले, आम्ही आधीच इथेनॉल उत्पादनासाठी प्रोत्साहन धोरण स्थापन केले आहे. आणि इथेनॉलच्या उत्पादनासाठी आमच्याकडे १५ प्रस्ताव दाखल झाले आहेत. एकूण २ हजार ६६६ कोटी रुपयांचे हे प्रस्ताव आहेत. आम्हाला अपेक्षा आहे की या गुंतवणुकीपासून ४००० प्रत्यक्ष रोजगार निर्माण होतील असे द्विवेदी म्हणाले.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link












