मंचर (पुणे) : ‘केंद्रीय मंत्री मंडळाने साखर उद्योगाबाबत घेतलेले निर्णय जुजबी व हंगामी स्वरूपाचे आहेत. त्यामुळे उस उत्पादक शेतकरी व साखर कारखान्यासमोर असलेले ज्वलंत प्रश्न सुटणार नाहीत.’ अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केली आहे.ते म्हणाले, ‘साखरेच्या निर्यातीबाबत निर्णय अपेक्षित होते. तिची मर्यादा 80 लाख टनापर्यंत वाढविणे गरजेचे आहे. याशिवाय उसाचा प्रोत्साहन दर 55 रुपये प्रती टना ऐवजी दुप्पट म्हणजे 110 रुपये प्रती टनापर्यंत केला पाहिजे. उस उत्पादक टिकला तर कारखाने टिकतील. त्याचा फायदा ग्राहकांना होणार आहे. हे सूत्र लक्षात घेतले तर साखर उद्योगाला आर्थिक अनुदान मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी साखर कारखान्याला मिळणाऱ्या कर्जाची पुर्नबांधणी व त्याचा विलंब अवधी वाढून दिला पाहिजे. याबाबत रिझर्व बँकेने तातडीने निर्णय घेतला पाहिजे. कारण कारखान्याकडे आज खेळत्या भांडवलाचा तुटवडा निर्माण झाला आहे.’आठ हजार कोटी रुपयांचे पॅकेज मंजूर झाले असले तरी उस उत्पादक शेतकऱ्यांच्या थकीत 22 हजार कोटी रुपयांच्या तुलनेत हे पॅकेज तुटपुंजी आहे.साखर विक्रीचा किमान दर प्रती किलो 29 रुपये निश्चितच असमाधानकारक आहे. उसाचा एफआरपी दर ठरविताना साखर विक्रीचा दर प्रती किलो 32 रुपये गृहीत धरला होता. तर सरासरी उत्पाद्न्न खर्च प्रती किलो 35 रुपये असताना केंद्र सरकारने प्रती किलो 29 रुपये किमान विक्री दर कशाच्या आधारावर निश्चित केला आहे हे कळत नाही. साखरेच्या तीस लाख टन राखीव साठ्याची कारखानानिहाय मात्र लवकर कळणे गरजेचे आहे. साखर साठ्यावरील व्याज, विमा साठवणूक व हाताळणीच्या खर्चाचा परतावा वेळेत मिळणे आवश्यक आहे. इथेनॉल निर्मिती क्षमता वाढीसाठीची व्याज सवलत स्वागतार्ह असली तरी ती तयार होण्यास कालावधी लागणार आहे. आजच्या घडीला या निर्णयाचा काही फायदा होणार नाही. महिनावार साखर वितरण कोटा वर्षभरासाठी सुरु करण्याचा अधिकार अन्न मंत्रालयाकडे देण्यात आला आहे. त्यामुळे स्थानिक दरातील सुधारणा होण्याची शक्यता आहे.
Recent Posts
મલેશિયા: વડા પ્રધાન ઇબ્રાહિમ મલેશિયાના લોકોને ખાંડનું સેવન ઘટાડવા વિનંતી
કુઆલા લમ્પુર: વડા પ્રધાન દાતુક સેરી અનવર ઇબ્રાહિમે મલેશિયાના લોકોને ખાંડનું સેવન ઘટાડવા વિનંતી કરી. તેમણે કહ્યું કે બિનઆરોગ્યપ્રદ ખાવાની આદતો, ખાસ કરીને વધુ...
ARAI ટૂંક સમયમાં ભારતમાં હાઇડ્રોજન IC એન્જિન ડેવલપમેન્ટ સુવિધા શરૂ કરશે
નવી દિલ્હી: ઓટોમોટિવ રિસર્ચ એસોસિએશન ઓફ ઇન્ડિયા (ARAI) આગામી વર્ષની અંદર ભારતમાં હાઇડ્રોજન IC એન્જિન ડેવલપમેન્ટ સુવિધા શરૂ કરશે, ARAIના ડિરેક્ટર ડૉ. રેજી મથાઈએ...
પંજાબ: PAU ખાંડ મિલ વિસ્તારોમાં ખેડૂતો માટે માર્ગ સલામતી જાગૃતિ કાર્યક્રમનું આયોજન કરે છે
લુધિયાણા: માર્ગ સલામતી સપ્તાહના ભાગ રૂપે, પંજાબ કૃષિ યુનિવર્સિટી (PAU) એ ખન્ના નજીક અમલોહમાં નાહર શુગર મિલમાં સલામતી જાગૃતિ અને તાલીમ શિબિરનું આયોજન કર્યું....
ભારતમાં ખાંડ ઉત્પાદનમાં ભવિષ્યના વલણો પર ઇન્ડોનેશિયન વ્યાવસાયિકો તાલીમ મેળવી રહ્યા છે.
કાનપુર: ઇન્ડોનેશિયાના પીટી એલપીપી એગ્રો નુસંતારાના વ્યાવસાયિકો માટે "કાર્યક્ષમ અને ટકાઉ ખાંડ ઉત્પાદનમાં ભવિષ્યના વલણો" પર એક અઠવાડિયાનો તાલીમ કાર્યક્રમ શુક્રવારથી શરૂ થયો. આ...
मलेशिया : प्रधानमंत्री इब्राहिम का मलेशियाई लोगों से चीनी का सेवन कम करने का...
कुआलालंपुर : प्रधानमंत्री दातुक सेरी अनवर इब्राहिम ने मलेशियाई लोगों से चीनी का सेवन कम करने का आग्रह किया।उन्होंने कहा कि, अस्वास्थ्यकर खाने की...
પાકિસ્તાન: પંજાબમાં ખાંડનું ઉત્પાદન ગયા વર્ષની સરખામણીમાં 266,000 મેટ્રિક ટન વધ્યું
લાહોર: પ્રાંતની ખાંડ મિલોએ ચાલુ 2025-26 પિલાણ સીઝન દરમિયાન અત્યાર સુધીમાં 24.89 મિલિયન મેટ્રિક ટન શેરડીનું પિલાણ કર્યું છે, જે 2.329 મિલિયન મેટ્રિક ટન...
કર્ણાટક: ખેડૂતોએ માલાપ્રભા શુગર મિલ મેનેજમેન્ટ પાસેથી બાકી રકમ ચૂકવવાની માંગ કરી
બેલાગવી: ભારતીય ખેડૂત સમાજ (BKS) ના રાજ્ય પ્રમુખ સિદાગૌડા મોદગીએ માંગ કરી છે કે કિત્તુર તાલુકામાં માલાપ્રભા સહકારી ખાંડ મિલના મેનેજમેન્ટ તાત્કાલિક ખેડૂતોના આશરે...
पुणे : सोमेश्वर कारखान्यातर्फे ५८७ ऊस तोडणी मजुरांची आरोग्य तपासणी
पुणे : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत येथील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यावरील ऊसतोड मजुरांसाठी आरोग्य शिबिर झाले. यामध्ये ५८७ स्त्री- पुरूष मजुरांनी सहभाग नोंदविला. या...
बिहार : ऊस उत्पादक शेतकरी वळताहेत अन्य पिकांकडे
भबुआ : बियाण्यांपासून ते बाजारपेठेपर्यंत भेडसावणाऱ्या अडचणी, कष्टाचे योग्य मूल्य न मिळणे यामुळे जिल्ह्यात ऊस शेती अडचणीत आली आहे. एकेकाळी जिल्ह्याची ओळख असलेली ऊस...
पंजाब : PAU द्वारा शुगर मिल इलाकों में किसानों के लिए सड़क सुरक्षा जागरूकता...
लुधियाना : सड़क सुरक्षा सप्ताह के हिस्से के रूप में, पंजाब एग्रीकल्चरल यूनिवर्सिटी (PAU) ने खन्ना के पास, अमलोह में नाहर शुगर मिल में...














