पुणे : माझ्यावर आरोप होतात की अजित पवार कारखाने बंद पाडतो. उलट मी बंद पडलेले साखर कारखाने चालू करतो. गेली तेरा वर्षे बंद थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखाना कुणालाही सुरू करता आला नाही. तो सुरू करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
उरुळी कांचन (ता. हवेली) येथे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या झालेल्या प्रचारसभेत पवार बोलत होते. याप्रसंगी प्रदीप कंद, अपूर्व पाटील आदी उपस्थित होते. शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले, या मतदारसंघात विद्यमान खासदारांनी एक रुपयाही निधी आणला नाही. जनतेला वाली हवा आहे. वाहतूककोंडी सोडविण्यासाठी काहीच काम केलेले नाही. हडपसर, पुणे – सोलापूर महामार्ग येथील वाहतूककोंडीचा प्रश्न का सुटला नाही, असा सवाल त्यांनी उपस्थिा केला.












