हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.
बिजनौर (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशात २०१७-१८ च्या हंगामासाठी सहकारी साखर कारखान्यांना पुरस्कार जाहीर झाले आहेत. राष्ट्रीय दक्षता पुरस्कारांमध्ये नजीबाबबाद सहकारी साखर कारखान्याने बाजी मारली असून, कारखान्याला सर्वोत्तम कारखान्याचा पुरस्कार देण्यात आला आहे. बिजनौरचे जिल्हा ऊस अधिकारी यशपाल सिंह यांनी ही माहिती दिली आहे. साखर उद्योगाच्या बळकटीसाठी कारखान्यांना प्रोत्साहन देण्याचा हेतू आहे. त्या अंतर्गत साखर कारखान्यांचे आधुनिकीकरण तसेच साखर उद्योगासाठी दिले जाणारे योगदान यावरून कारखान्यांनी निवड करण्यात आली आहे. दरम्यान, राज्याचे नगरविकास मंत्री सुरेशकुमार खन्ना येत्या २६ जूनला जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांचे खासगी सचिव छोटे लाल यांनी ही माहिती दिली. सुरेशकुमार स्वच्छता, पेयजल, अमृत योजना, पंतप्रधान आवास योजना या योजनांवर चर्चा करणार आहेत.
















