मुंबई : कृषी मंत्रालयाकडून नव्याने उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार, भारतीय शेतकऱ्यांनी एक ऑक्टोबरपासून १०.१ मिलियन हेक्टरमध्ये गव्हाचे पारणी केली आहे, असे वृत्त रायटर्सने दिले आहे. हा आकडा गेल्या वर्षीच्या तुलनेत १५ टक्क्यांनी अधिक आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, शेतकऱ्यांनी १८ नोव्हेंबरपर्यंत हिवाळ्यात पेरणी केली जाणाऱ्या तेलबिया याअंतर्गत लागवड क्षेत्र ६.३ मिलियन हेक्टर झाले आहे. गेल्या वर्षीच्या ५.५ मिलियन हेक्टरच्या तुलनेत हे क्षेत्र अधिक आहे.
२९ ऑक्टोबरपर्यंत देशात ५४,००० हेक्टरमध्ये गव्हाची पेरणी करण्यात आली होती. मुख्य रब्बी हंगामात गव्हाची पेरणी ऑक्टोबर महिन्यापासून सुरू होते आणि मार्च – एप्रिल महिन्यात याची कापणी केली जाते. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान आणि जम्मू-काश्मीरमध्ये सध्या गव्हाची पेरणी सुरू आहे.















