देशात ‘एफआरपी’मध्ये सातत्यपूर्ण वाढ, शेतकरी ऊस लागवडीविषयी सकारात्मक

नवी दिल्ली : अनुकूल हवामान, विविध प्रयत्नांमुळे उसाच्या उत्पादनात वाढ झाली आहे, असा दावा केंद्र सरकारने केला आहे.’एफआरपी’मधील सातत्यपूर्ण वाढ, कारखान्यांनी एफआरपी वेळेत देण्याबाबत केंद्राची राहिलेली सकारात्मक भूमिका यामुळे ऊस उत्पादकांना वेळेवर दर मिळण्याची हमी निर्माण झाली. परिणामी ऊस लागवड वाढविण्याबाबत सकारात्मक मानसिकता निर्माण झाल्याने शेतकरी ऊस उत्पादनाकडे वळले, असे केंद्र सरकारने म्हटले आहे. २०२३-२४ चा अपवाद वगळता उत्पादनात प्रत्येकी वर्षी वाढ सुरू आहे. गेल्या पाच वर्षांत देशात उसाच्या उत्पादनात सातत्याने वाढ झाली असल्याचा दावा केंद्राने केला. केंद्रीय कृषी राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी सांगितले की, केंद्राने ऊस उत्पादकांसाठी घेतलेले निर्णय फलदायी ठरल्यानेच देशात ऊस उत्पन्न वाढीचा आलेख चढता राहिला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उसाची एफआरपी २०२०-२१ मध्ये २८५० रुपये प्रति टन होती. २०२४-२५ मध्ये ३४०० रुपये प्रति टनांपर्यंत गेली. २०२५-२६ साठी ३५५० रुपये टनांपर्यंत वाढविण्यात आली आहे. ‘शेतकऱ्यांचे उत्पन्न केवळ उसाच्या उत्पादनावर अवलंबून नसते, तर उसाचा वाजवी आणि किफायतशीर भाव, राज्य सल्लागार भाव यासारख्या इतर घटकांनी देखील शेतकऱ्यांना उसाचे पेमेंट मिळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. एफआरपीची वेळेवर घोषणा, अतिरिक्त साखरेचे इथेनॉल उत्पादनाकडे वळविण्याबाबत धोरण, साखर निर्यातीबाबतचा निर्णय इत्यादींच्या बाबतीत सरकारने केलेल्या वेळेवर धोरणात्मक हस्तक्षेपांमुळे, साखर कारखान्यांना शेतकऱ्यांना उसाचे पेमेंट त्वरित देणे शक्य असल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here