यमुनानगर : सरस्वती साखर कारखान्याने (एसएसएम) ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देताना ५५ कोटी रुपयांची बिले जमा केली आहेत. राज्य सरकारने आतापर्यंत या हंगामातील पिकासाठी राज्य समर्थन मुल्याची (एसएपी) घोषणा केलेली नाही आणि शेतकरी आर्थिक संकटात अडकले आहेत. शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीतून मदत मिळावी यासाठी कारखाना व्यवस्थापनाने शेतकऱ्यांना बिले दिली आहेत. सरस्वती कारखान्याने राज्यात सर्वात आधी ८ नोव्हेंबर रोजी गाळप सुरू केले असून आतापर्यंत ४२ लाख क्विंटल उसाचे गाळप करण्यात आले आहे. एमएसएमने ३० नोव्हेंबरअखेर ऊस पुरवठा करणाऱ्या ९,९२७ शेतकऱ्यांना पैसे दिले आहेत.
यमुनानगर एसएसएमचे वरिष्ठ उपाध्यक्ष (ऊस विभाग) धरमपाल सिंह यांनी हिंदूस्थान टाइम्सला सांगितले की, ऊस उत्पादक शेतकऱ्यांसमोर येणारे आर्थिक संकट सोडविण्यासाठी आणि त्यांना आपल्या दैनंदिन खर्च भागविण्यास मदत म्हणून बिले दिली आहेत. त्यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना कोणत्याही जबाबदारीविना, हे पैसे दिले आहेत. सरकारकडून जाहीर केल्या जाणाऱ्या दरानंतर ही रक्कम कपात केली जाईल. गेल्या काही आठवड्यांत अनेक शेतकरी संघटनांनी राज्यात निदर्शने केली आहेत. सरकारने SAP देण्याची मागमी केली आहे. हरियाणात ऊसासाठी गेल्या वर्षी ₹३६२ प्रती क्विंटल एसएपी होती. राज्य सरकारने चालू हंगामात आतापर्यंत दराची घोषणा केलेली नाही.















