नवी दिल्ली : आतापर्यंत विविध माध्यमांतून एकूण 1.10 कोटी फास्टॅग स्टिकरचे वाटप झाले आहे. दररोज सरासरी दीड ते दोन लाख स्टिकरचे वितरण होत आहे. यावरून फास्टॅग प्रणाली देशभरातून स्वीकारली गेल्याचे दिसत आहे, असे प्राधिकरणाच्या अधिकार्याणी सांगितले.
वाहनचालकांच्या खात्यातून टोल रक्कम परस्पर वसूल करण्याची सुविधा देणार्या फास्टॅग प्रणाली अंतर्गत आतापर्यंत 1.10 कोटी स्टिकर्स वितरित करण्यात आले आहेत.
फास्टॅग लागू केल्यानंतर केवळ आठ दिवसांत या प्रणालीद्वारे होणार्या व्यवहारांची संख्या 24 लाखांवर पोहोचली आहे. या प्रणालीचा वापर करताना वाहनचालकांना काही समस्याही जाणवत आहेत. या सर्व समस्यांचा निपटारा केला जात आहे, अशी माहितीही या अधिकार्याणी दिली. टोल नाक्यांवरील वाहतूक कोंडी कमी होऊन प्रदूषणात घट व्हावी या हेतूने प्राधिकरणाने 15 डिसेंबरपासून देशभरात फास्टॅग प्रणाली लागू केली आहे. या स्टिकर्ससाठी अर्ज केलेल्यांपैकी अनेक चालकांना अद्याप ते न मिळाल्याने 15 जानेवारीपर्यंत रोखीने टोल भरण्याची मुभा देण्यात आली आहे. रोखीने टोल भरण्यासाठी प्रत्येक टोल नाक्यावरील 25 टक्के मार्गिका राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.