एनव्हिपी शुगरच्या चाचणी हंगामात एक लाख १२ हजार टन ऊस गाळप

धाराशिव : जागजी येथील एन. व्हि. पी. शुगर कारखान्याचे मार्गदर्शक आप्पासाहेब पाटील, चेअरमन बालाजी पाटील यांच्या उपस्थितीत कारखान्याचा सांगता समारंभ झाला. कारखान्याच्या सभासदांनी केलेल्या सहकार्यामुळे कमी कालावधीत १ लाख १२ हजार मे. टन उच्चांकी यशस्वी गाळप होऊ शकले, अशी प्रतिक्रिया पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. यावेळी प्रमुख पाहुण्यांसह खातेप्रमुख, तोडणी वाहतूक ठेकेदार, कर्मचाऱ्यांच्या हस्ते गव्हाण पूजन करून सांगता समारंभ करण्यात आला.

कार्यक्रमात कारखान्यास ऊस उत्पादक शेतकरी वाहन मालक, तोडणी ठेकेदार, चालक, ऊस उत्पादक शेतकरी आदींचा सत्कार करण्यात आला. ऊस वाहतूक करणारे बालाजी बुकन, (२७८६ मे. टन), भजनदास जमाले (२४०६ मे. टन), गोरोबा रोटे (२११२ मे. टन), डबल मिनीमध्ये श्रीकृष्ण गडदे (२२३४ मे. टन), पिंटू काळे (१८६३ मे. टन), एकनाथ गडदे (१७९७ मे. टन), हार्वेस्टिर मालक शिवानंद दळवी, बलभीम बुकन, दस्तगिर सय्यद या वाहतूक ठेकेदारांचा बक्षिस देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. कारखान्याने १५ मार्चपर्यंत गाळपास आलेल्या ऊसाचे २,८०० रुपयांनुसार बिल बँक खात्यात वर्ग करण्यात येत आहे असे चेअरमन पाटील यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here