राहाता तालुक्यात १० एकर ऊस खाक

अहमदनगर : राहाता तालुक्यातील ममदापूर शिवारात वीज वाहक तारांचे घर्षण होवून ऊस पिकामध्ये ठिणगी पडून डॉ. प्रकाश आदक व ससाणे यांचा सुमारे १० एकर ऊस व ड्रिपचे पाईप खाक झाले. आगीत विलास उत्तमराव आदक यांचा २ एकर, सुमनबाई उत्तमराव आदक दीड एकर, डॉ. प्रकाश मधुकराव आदक यांचा २ एकर तर सुरेखा विलास ससाणे व कोमल ससाणे यांचा ५ एकर क्षेत्रातील ऊस जळाला. आगीमध्ये आदक व ससाणे या शेतकऱ्यांचे सुमारे ४० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. प्रवरा साखर कारखान्याची अग्निशामक गाडी आल्याने आगीवर नियंत्रणात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here