लक्सर : लक्सर येथील राय बहादूर नारायण सिंह साखर कारखान्याने गेल्या गळीत हंगामात, २०२१-२२ मध्ये १५ मे अखेर ऊस गाळप केले होते. यामध्ये १० मे अखेपर्यंत खरेदी केलेल्या ऊसापोटी ऊस समित्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पैसे दिले आहेत, अशी माहिती कारखान्याचे मुख्य व्यवस्थापक अजय कुमार खंडेलवाल यांनी दिली.
लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, गेल्यावर्षीच्या गळीत हंगामात १५ मेपर्यंत ऊस खरेदी केला होता. त्यातील आधीचे पैसे ऊस समित्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत. त्यानंतर ११ मे पासून १५ मे अखेरपर्यंत, सत्र समाप्तीदरम्यान, ऊस खरेदी केलेल्या शेतकऱ्यांना १० कोटी ५ लाख रुपयांचे धनादेश ऊस समित्यांकडे देण्यात आला आहे. लक्सर ऊस समितीचे प्रभारी सचिव सूरजभान सिंह यांनी सांगितले की, आधी हे पैसे ऊस समित्यांच्या बँक अकाऊंटमध्ये जातील. त्यानंतर सरकारकडून हे पैसे शेतकऱ्यांच्या बँक अकाऊंटवर जमा करण्यात येणार आहेत.