पंजाब सरकारकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी १०० कोटी रुपये जारी

70

चंडीगढ : पंजाब सरकारने शनिवार ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये १०० कोटी रुपये जारी केले आहेत. मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रवक्त्याने ही माहिती देताना सांगितले की, मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार, शनिवारी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये शुगरफेडकडून (Sugarfed) निधी हस्तांतरीत करण्यात आला आहे.

शुगरफेडकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिली जाणारी थकबाकी ९५.६० कोटी रुपये आहे. यापैकी १०० कोटी रुपयांची बिले यावर्षी ३१ ऑगस्टपर्यंत दिली जातात. ऊर्वरीत ९५.६० कोटी रुपये १५ सप्टेंबरपर्यंत दिले जाणार आहेत. या शंभर कोटी रुपयांबरोबरच राज्य सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ६१९.६२ कोटी रुपयांच्या थकीत ऊस बिलांपैकी ४२४.०२ कोटी रुपये आधीच दिले आहेत. ही ऊस थकबाकी २०२१-२२ या गळीत हंगामातील आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here