दहा वर्षांत होणार रेल्वेचे 100 टक्के विद्युतीकरण : गोयल

नवी दिल्ली – कार्बनच्या वाढत्या प्रभावावर अंकुश ठेवण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून सरकारने रेल्वेच्या 100 टक्के विद्युतीकरणाच्या दिशेने वाटचाल करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी बुधवारी दिली. पुढील दहा वर्षांत भारतीय रेल्वे अक्षय ऊर्जेवर चालणार असल्याचे त्यांचे एक लक्ष्य असल्याचे रेल्वेमंत्र्यांनी सांगितले.

“आंम्ही १०० टक्के विद्युतीकृत रेल्वेकडे वाटचाल करण्याचा निर्णय घेतला आहे. जगातील सर्वात मोठी रेल्वे ही भारताकडे असणार आहे जिचा, जवळपास १,२०,००० किलोमीटरचा ट्रॅक असून तिचे १०० टक्के विद्युतीकरण होईल.” असे गोयल म्हणाले. सीआयआयच्या टिकाव समिटमध्ये ते बोलत होते. ते म्हणाले, नवी दिल्लीकडे जाणा अर्ध्याहून अधिक गाड्या अद्याप डिझेलवर आधारीत आहेत परंतु आता त्यांच्या विद्युतीकरणावर काम करत आहे.

“आतापासून एका वर्षानंतर, नवी दिल्लीकडे येणाऱ्या गाड्यांचे विद्युतीकरण करण्यात येणार आहे. या सर्वच गाडया पूर्णपणे इलेक्ट्रीफाइड आहेत, याची खात्री केल्यानंतरच हे पाऊल उचलण्यात आले आहे.” असेही त्यांनी स्पष्ट केले. कार्बनचा प्रभाव कमी करुन, पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी रेल्वे पर्यावरण-अनुकूल किंवा ऊर्जा-कार्यक्षम उपाययोजना करीत आहे.

२०१८-१९ मध्ये भारतीय रेल्वेने आपल्या उर्जेच्या आवश्यकतेसाठी सुमारे २०.४४ अब्ज युनिट वीज आणि ३.१ अब्ज लिटर हाय-स्पीड डिझेल (एचएसडी) वापरले आहे. ते म्हणाले, माझे एक ध्येय आहे की येत्या 10 वर्षांत भारतीय रेल्वेचे 100 टक्के विद्युतीकरण होईल आणि 100 टक्के नूतनीकरणक्षम ऊर्जा-चालित रेल्वे असेल, तसेच स्टार्ट अप्सची या क्षेत्राची भूमिका मोठी आहे, असेही ते म्हणाले.

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here