सुल्तानपूर : दालमिया भारत शुगर अँड इंडस्ट्रीजच्या रामगढ शुगर युनिटने गळीत हंगाम २०२२-२३ मधील सर्व ऊस बिले उत्पादक शेतकऱ्यांना अदा केली आहेत. साखर कारखान्याचे उप कार्यकारी संचालक आगा आसिफ बेग यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली.
लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, रामगढ शुगर युनिटने यंदाच्या गळीत हंगामात एकूण १२०.१३ लाख क्विंटल ऊस खरेदी केला आहे. या उसापोटी उत्पादक शेतकऱ्यांना २९ मे रोजी शिल्लक राहिलेली १३ कोटी रुपांची बिले त्यांच्या बँक खात्यांमध्ये पाठवली आहेत. साखर कारखान्याने शेतकऱ्यांना एकूण ४१६.८७ कोटी रुपयांची ऊस बिले दिली आहेत. कारखान्याने शंभर टक्के ऊस बिले अदा केली असल्याचे माहिती उप कार्यकारी संचालक बेग यांनी सांगितले.