परिचारक कारखान्यातर्फे प्रति टन १०० रुपये बिल बँकेत वर्ग : चेअरमन प्रशांत परिचारक

सोलापूर : कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याने गळीत हंगाम २०२२-२३ मध्ये गाळप केलेल्या उसास प्रति मे. टन १०० रुपयांप्रमाणे ऊस बिल बँकेत वर्ग केले आहे. शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ऊस बिलाची एकूण रक्कम १० कोटी जमा केली आहे. सोलापूर जिल्ह्यात सर्वात जास्त एफआरपी दिल्याचे चेअरमन प्रशांत परिचारक यांनी सांगितले.

चेअरमन प्रशांत परिचारक म्हणाले कि, गळीत हंगाम २०२२-२०२३ मध्ये कारखान्याने जिल्हयात प्रथम क्रमांकाचा साखर उतारा मिळाला. कारखान्याने जिल्ह्यात प्रथम क्रमांकाचा ऊस दरही दिला आहे. आजपर्यंत कारखान्याने प्रति टन २६०० रुपयांप्रमाणे ऊस बिल अदा केले आहे. उर्वरित एफआरपीची रकम दीपावली सणावेळी अदा केली जाणार आहे. ते म्हणाले, चालू हंगामात आसवनी प्रकल्पामधून वाढीव क्षमतेनुसार इथेनॉल व उपपदार्थांची निर्मिती केली आहे. तसेच ‘ज्यूस टू इथेनॉल’चीही निर्मिती केली आहे त्याचबरोबर पुढील हंगामात कारखान्याचे विस्तारीकरण होणार आहे. ऊस गाळप प्रति दिन ९,००० मे.टनप्रमाणे होणार आहे.

यावेळी कारखान्याचे व्हा. चेअरमन कैलास खुळे व कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी, संचालक दिनकर मोरे, वसंत देशमुख, उमेश परिचारक, दिलीप चव्हाण, ज्ञानदेव दोबळे, तानाजी वाघमोडे, बाळासाहेब यलमर, भगवान चौगुले, लक्ष्मण धनवडे, भास्कर कसगावडे, भैरू वाघमारे, गंगाराम विभुते, हणमंत कदम, सुदाम मोरे, विजय जाधव, किसन सरवदे, श्यामराव साळुंखे, राजू पाटील, दाजी पाटील, दिलीप गुरव आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here