मागणी अभावी 11 लाख मेट्रिक टन साखर पडून

अहमदनगर : बाजारातील साखरेची मागणी घटल्याने जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे, साखरेला उठाव नसल्याने जिल्ह्यातील 28 सहकारी साखर कारखान्यांच्या गोदामात 11 लाख 23 हजार मेट्रिक टन साखर पडून आहे़ त्यामुळे जिल्हा बँकेकडून घेतलेली उचल परत करणे कारखान्यांना कठीण झाले आहे.

साखरेवर प्रति क्विंटलवर जिल्हा बँकेकडून कारखान्यांना 85 टक्के उचल कर्ज रुपाने मिळते, जिल्ह्यातील कारखान्यांनी जिल्हा बँकेकडून उचल घेतली, मात्र गेल्या नऊ महिन्यांमध्ये साखरेला उठाव नाही त्यामुळे जिल्हा बँकेकडून घेतलेले कर्ज परत करणे कारखान्यांना शक्य झाले नाही, बँकेचे कर्ज कारखान्यांच्या डोईजड झाले आहे.
सभासदांना एफआरपी प्रमाणे दर कारखान्यांनी दिला, कारखान्यांनी कर्ज घेऊन शेतकर्‍यांचे पैसे दिले, मात्र आता मागणी नसल्यामुळे साखर पडून आहे, अतिरिक्त साखर साठविण्यावर कारखान्यांचा खर्च होत असून, अतिरिक्त साखर कारखान्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे.

साखरेला बाजारात उठाव नाही, त्यामुळे आधीच अडचणीत असलेल्या जिल्ह्यातील साखर कारखान्यांसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे, त्यामुळे कारखान्यांना घेतलेले कर्ज परत करणे शक्य नाही, त्यावरील व्याजाची रक्कम वाढत आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here