महाराष्ट्रात ११० साखर कारखाने बंद

पुणे : महाराष्ट्रातील गाळप हंगाम आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. राज्यात ५ एप्रिल २०२१ अखेर ११० साखर कारखाने बंद झाले आहेत.

साखर आयुक्तालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, ५ एप्रिलअखेर राज्यात १८८ साखर कारखान्यांनी गाळप हंगामात भाग घेतला. राज्यात ९७४.९२ लाख टन उसाचे गाळप झाले असून १०२०.३४ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा १०.४७ टक्के इतका आहे.

साखर आयुक्तालयाने दिलेल्या माहितीनुसार, सोलापूर विभागातील सर्व ४३ कारखाने बंद झाले आहेत. तर कोल्हापूर विभागातील ३१ साखर कारखाने बंद करण्यात आले आहेत. नांदेड विभागातील १३ कारखान्यांचा गाळप हंगाम संपुष्टात आला असून पुणे विभागातील ११ कारखाने बंद झाले आहेत. अहमदनगर विभागातील ७ कारखाने बंद झाले आहेत. तर औदंगाबाद आणि अमरावती विभागातील प्रत्येकी २ आणि नागपूर विभागातील एका कारखान्याचा गाळप हंगाम आटोपला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here