गेल्या 24 तासात 1,112 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

भारतात कोविड-19 प्रतिबंधात्मक लसीकरण झालेल्यांच्या संख्येने आज सकाळी 7 वाजेपर्यंत 219.58 कोटींचा आकडा (2,19,58,84,786) ओलांडला.

12 ते 14 वर्षे वयोगटाच्या कोविड-19 प्रतिबंधात्मक लसीकरणाला 16 मार्च 2022 पासून देशात सुरुवात झाली. तेव्हापासून आजतागायत, 4.12 कोटींपेक्षा जास्त (4,12, 39,308) किशोरवयीन मुलांना लसीची पहिली मात्रा देऊन झाली आहे. तसेच, 18 ते 59 वर्षे वयोगटातील नागरिकांना खबरदारीची मात्रा देण्यास 10 एप्रिल 2022 पासून सुरुवात करण्यात आली.

भारतात सध्या कोविड-19 बाधितांची संख्या 20,821 आहे. हे प्रमाण देशातील एकूण कोविड-19 बाधितांच्या संख्येच्या 0.05% इतके आहे.

देशात रूग्ण बरे होण्याचा दर आता 98.77% इतका आहे. गेल्या 24 तासांत 1,892 रूग्ण बरे झाले आहेत. साथ सुरू झाल्यापासून आजवर बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता 4,40,97,072 इतकी आहे.

बरे झालेल्या रुग्णांची संख्या 4.40 कोटींपेक्षा जास्त आणि रुग्ण बरे होण्याचा दर 98.77%.

गेल्या 24 तासांत देशात 1,112 नवे कोविड-19 बाधितांची नोंद झाली.

गेल्या 24 तासांत 2,000 पेक्षा कमी नव्या कोविड-19 बाधितांची नोंद

गेल्या 24 तासांत कोविड-19 च्या एकूण 1,44,491 चाचण्या करण्यात आल्या. भारतात आजवर 90.04 कोटींपेक्षा जास्त (90,04,17,092) चाचण्या करण्यात आल्या आहेत.

देशातील साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर आता 1.06% इतका असून दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 0.77% इतका आहे.

पॉझिटिव्हिटीचा आलेख (साप्ताहिक सरासरीनुसार) आजचा दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 0.77%

(Source: PIB)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here