विभागातील दहा साखर कारखान्यांकडे ११४४ कोटींची थकबाकी: भगत सिंह

सहारनपूर : सहारनपूर विभागातील दहा साखर कारखान्यांनी गेल्या वर्षीचे उद्याप ११४४ कोटी रुपयांची ऊस बिले थकवली आहेत अशी माहिती पश्चिम प्रदेश मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष भगतसिंह वर्मा यांनी दिली. गेल्यावर्षी ऊस बिले उशीरा दिल्यामुळे सहारनपूर विभागातील १७ कारखान्यांकडे व्याजासह १५०० कोटी रुपयांची थकबाकी आहे. ऊस बिले न मिळाल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटातून जात असल्याचे त्यांनी सांगितले.

पश्चिम प्रदेश मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष भगत सिंह वर्मा हे पेपरमील रोडवरील कार्यालयात आयोजित बैठकीत बोलत होते. ते म्हणाले, भाजपच्या योगी सरकारने उसाचा दर ६०० रुपये क्विंटल करावा. त्याशिवाय साखर कारखान्यांकडून थकीत ऊस बिले आणि व्याज वसुल करून द्यावे. अन्यथा २०२२ मध्ये होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला पराभव पत्करावा लागेल असा इशारा वर्मा यांनी दिला.

ऊस मंत्री सुरेश राणा यांच्या थाना भवन विधानसभा मतदारसंघातील बजाज साखर कारखान्याकडे सर्वाधिक २१२ कोटी रुपयांची थकबाकी आहे. सहारनपूर जिल्ह्यातील बजाज साखर कारखाना गांगनौलीकडे १६५ कोटी रुपयांची थकबाकी आहे. सहारनपूर जिल्ह्यातील पाच कारखान्यांनी गेल्या वर्षीचे ३४५ कोटी रुपये आणि पाचशे कोटी रुपयांचे व्याज थकवले आहे. त्यामध्ये गांगनौलीच्या बजाज साखर कारखान्याकडे १६५ कोटी रुपये, नानौता सहकारी कारखान्याकडे ७३ कोटी रुपये आणि सरसावा कारखान्याकडे ४५ कोटी रुपये थकीत आहेत. गागलहेडीच्या दया साखर कारखान्याने शेतकऱ्यांचे ४२ कोटी रुपये अद्याप दिले नसल्याचे वर्मा यांनी सांगितले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here