आयकर विभागाकडून करदात्यांना १,१५,९१७ कोटी रुपयांचा परतावा

66

नवी दिल्ली : केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने (सीबीडीटी) बुधवारी सांगितले की, चालू आर्थिक वर्षातील एप्रिलपासून आठ नोव्हेंबरपर्यंत ९८.९० लाख करदात्यांना १,१५,९१७ कोटी रुपयांचा आयकर परतावा देण्यात आला आहे.

याबाबत सीबीडीटीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, यामध्ये व्यक्तिगत आयकराच्या ९७,१२,९११ प्रकरणात ३६,००० कोटी रुपयांचा परता देण्यात आला आहे. तर कंपनी आयकराच्या १,७७,१८४ प्रकरणांमध्ये एकूण ७९,९१७ कोटी रुपयांच्या परताव्याचा समावेश आहे. सीबीडीटीने दिलेल्या माहितीनुसार, ६५,३१ लाख रुपयांचा परतावा २०२१-२२ या वर्षातील आहे. यामध्ये १२,६१६.७९ कोटी रुपये परत देण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here