किसन वीर कारखान्याकडून १३ कोटींची ऊस बिले अदा : व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे

सातारा : भुईंज येथील किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याने पहिल्या पंधरवड्याच्या ऊस बिलापोटी १३ कोटी ११ लाख ३८ हजार २५६ रुपये संबंधित सभासद, बिगर सभासद शेतकऱ्यांच्या सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत. कारखान्याने उसाला प्रती टन ३ हजार रुपये हप्ता जाहीर केला आहे. त्यानुसार बिले दिली जात असल्याची माहिती किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

व्हाईस चेअरमन शिंदे यांनी सांगितले की, किसन वीर व खंडाळा या दोन्ही कारखान्यांना कोणत्याही बँकेचा वित्त पुरवठा होत नसल्यामुळे पहिल्या पंधरवड्यातील बीलांना विलंब झालेला आहे. मात्र ३ नोव्हेंबरला किसन वीर कारखान्याचा गळित हंगामास सुरुवात झाली होती. कारखान्याने यापूर्वीच पहिल्या पंधरवड्याची सेव्हिंग्जची बीले शेतकऱ्यांची खात्यावर वर्ग केली होती. आता पहिल्या पंधरवड्यातील उर्वरित सोसायटीची बिलेही शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आलेली आहेत. आमदार मकरंद आबा पाटील यांच्या नेतृत्वाखालील व्यवस्थापन कायमच शेतकऱ्यांच्या बाजूने उभे आहे, असेही शिंदे म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here