महाराष्ट्रात 13 साखर कारखान्यांनी केले ऊस गाळप बंद, 45.68 लाख टन साखर उत्पादन

पुणे : जस जसा ऊस गाळप हंगाम पुढे जात आहे, तसे तसे महाराष्ट्रात अनेक कारखाने गाळप बंद करत आहेत. हा हंगाम राज्यातींल साखर कारखान्यांसाठी पहिल्यापासूनच आव्हानात्मक राहिला आहे. महाराष्ट्रातील पश्‍चिम भागात महापूर आणि मराठवाड्यातील दुष्काळामुळे ऊस पीकाचे नुकसान झाले होते, आणि मराठवाड्यात ऊसाचा वापर जनावरांच्या चार्‍यासाठी केला गेल्याने ऊस गाळपावर त्याचा परिणाम दिसून येत आहे. ऊस तोड कामगारांच्या समस्यांनीही साखर कारखान्यांना अडचणीत आणले आहे.

या सार्‍याचा परिणाम साखर उत्पादनावर झाला आहे. राज्यातील साखर कारखान्यांनी 19 फेब्रुवारी 2020 पर्यंत 418.77 लाख टन ऊस गाळप केले. तसेच 10.91 साखर रिकवरीसह 45.68 लाख टन साखरेचे उत्पादन केले आहे.

सध्याच्या हंगामा दरम्यान राज्यात 143 कारखान्यांनी गाळपात भाग घेतला होता, आणि त्यातील 13 कारखान्यांनी ऊस गाळप बंद केले आहे. औरंगाबाद विभागात 7, अहमदनगर 3, सोलापूर 2 आणि पुणे येथील 1 साखर कारखान्याचे गाळप बंद झाले आहे. येत्या 15-20 दिवसांच्या आत बहुतेक कारखान्यांचा हंगाम संपेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

यावेळी, महाराष्ट्रात पूर आणि दुष्काळामुळे ऊस उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. तसेच राज्याच्या राजकीय अनिश्तितेमुळे ऊस गाळप सुरु होण्यास उशिर झाला. माननीय राज्यपाल यांनी 22 नोव्हेंबर ला अधिकृतपणे हंगाम सुरु करण्याची परवाणगी दिली होती.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here