बिराजदार कारखान्याची १४.२० लाखाची फसवणूक, तिघांविरोधात गुन्हा

धाराशिव : ऊस वाहतुकीचा १८ लाख रुपयांचा करार करूनही ऊस वाहूतक न करता उमरगा तालुक्यातील समुद्राळ येथील क्युनर्जी इंडस्ट्रीज संचलित भाऊसाहेब बिराजदार सहकारी साखर कारखान्याची फसवणूक केल्या प्रकरणी दुधणी (ता. अक्कलकोट) येथील तिघांविरोधात लोहारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये प्रकाश दामू राठोड, संजय सुरेश चव्हाण, अभिजित सीताराम राठोड यांचा समावेश आहे.

कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी पैसे वसुलीसाठी गेले असता संशयित आरोपींनी, ३ लाख ८० हजार रुपये कारखान्याच्या खात्यावर जमा केले. कारखाना अधिकाऱ्यांनी उर्वरित पैशाची मागणी केली असता, तुमचे पैसे देणार नाही, असे म्हणून कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रश्नी कारखान्याचे वसुली अधिकारी माधव व्यंकटराव पाटील यांनी तिघा विरोधात लोहारा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here