10 शेतकर्‍यांच्या 14 एकर ऊसाला आग

113

मंचर चांडोली बुद्रुक : येथील वेताळमळा परिसरात अनेक शेतकर्‍यांनी ऊस लावला आहे. या परिसरातला बुधवारी अचानक आग लागली. ही आग मोठी होती. या आगीमुळे 10 शेतकर्‍यांच्या 14 एकर क्षेत्रातील ऊस जळाला. शेतकर्‍यांचे 9 ते 10 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

दुपारी साडे चार वाजण्याच्या सुमारास ऊसाच्या शेतीला आग लागली. सुरुवातीला हरिभाउ थोरात यांच्या ऊसाला आग लागली. त्यानंतर आग भकडून गोविंद थोरात, तुकाराम थोरात, दत्तात्रय थोरात, रमण थोरात, संजय थोरात, जयदीप थोरात या शेतकर्‍यांच्या ऊसाला आग लागली.

आग लागल्यानंतर भीमाशंकर कारखान्याच्या ऊस तोडणी मजुरांनी तातडीने धाव घेत मदत केल्याने बारा एकर क्षेत्रातील ऊस वाचविण्यात यश आले. शेतकर्‍यांनी विहीरीवरील विद्युत मोटार सुरू करुन आग विझवण्याचा प्रयत्न केला. आगीची तीव्रता व झळा अधिक असल्याने शेतकर्‍यांना 14 एकर क्षेत्रातील ऊस वाचवता आला नाही.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here