विजेच्या तारांमधून ठिणग्या, १५ एकर ऊस जळाला

96

नवाबगंज : शेतावरून गेलेल्या अतिउच्च दाबाच्या विज वाहिन्यांमधून पडलेल्या ठिणग्या उसाच्या शेतात पडल्याचा प्रकार घडला. यामध्ये जवळपास १५ एकर ऊस जळून खाक झाला. ग्रामस्थांनी अथक प्रयत्नांनी या आगीवर नियंत्रण मिळवले. शेतकऱ्यांनी या घटनेची वर्दी नवाबगंज पोलीस ठाण्यात दिली आहे.

धौरेरा गावामध्ये रामभरोसे लाल आणि छोटेलाल यांचे हे शेत आहे. त्यांनी ऊस लागण केली होती. शुक्रवारी संध्याकाळी त्यांच्या शेतावरून गेलेल्या अतिउच्च दाबााच्या विजेच्या तारांमधून ठिणग्या पडल्या. त्यामुळे परिसरातील १५ एकर ऊस जळून खाक झाला. त्याची माहिती मिळाल्यावर ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणण्यासाठी अथक प्रयत्न केले. रामभरोसे लाल आणि छोटेलाल यांनी या घटनेची माहिती नवाबगंज पोलीस ठाण्यात दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here