कारखान्यांकडून 15% व्याज आकारा

973

कोल्हापूर, दि. 21 : ज्या साखर कारखान्यांनी पंधरा दिवसात एफआरपीची रक्कम दिलेले नाही. त्या साखर कारखान्यांकडून 15 टक्के प्रमाणे व्याजाची आकारणी लावली अशी मागणी अंकूश संघटनेच्यावतीने करण्यात आले. आज (शुक्रवार) प्रादेशिक साखर सहसंचालकांच्या कार्यालयासमोर संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर सहसंचाकांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.

निवेदनात म्हटले आहे की, डिसेंबर 2017 पासून तोड झालेल्या उसाची पूर्ण एफआरपी मिळालेली नाही. पंधरा दिवसात एफआरपी देण्याचा कायदा असतानाही साखर कारखान्यांनी हा कायदा मोडला आहे. त्यामुळे, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. यासाठी ठिय्या आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागणार आहे. काही अपवाद वगळता बहुसंख्य कारखान्यांनी एफआरपी दिलेली नाही. त्यांच्यावर शुगर केन कंट्रोल ऑर्डर 1966 नूसार 15 टक्के प्रमाणे व्याज शेतकऱ्यांना द्यावे लागते. ते देण्यासाठी प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाने कारवाई केली पाहिजे. अशीही मागणी केली आहे. यावेळी, संघटनेचे अध्यक्ष धनाजी चुडमूंगे, राकेश जगदाळे, दिपक बंडकर उपस्थित होते.

SOURCEChiniMandi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here