ब्राझीलमधील साखर उत्पादन कंपनीतील 15 कर्मचारी कोरोना पॉजिटिव्ह

ब्राझील : कोरोना वायरसचा फैलाव दिवसेंदिवस वाढतच आहे. याचा सर्वात जास्त परिणाम अमेरिका आणि उर्वरीत साखर उत्पादक देशांपैकी ब्राझीलमध्येही होत आहे. ब्राझीलमध्ये कोरोना प्रकरणात वाढ दिसून आली आहे. आता कोरोनाने साखर कारखान्यामध्ये काम करणार्‍या कर्मचार्‍यांभोवतीची आपला विळखा घट्ट केला आहे.

ब्राझीलच्या साखर उत्पादन कंपनी रायजन मध्ये काम करणार्‍या 15 कर्मचार्‍यांची कोरोना टेस्ट पॉजिटिव्ह आली आहे. कंपनीने आपल्या कर्मचार्‍यांची सामूहिक टेस्ट करुन घेतली होती, त्यानंतर ही कोरोना प्रकरणे समोर आली आहेत.

कोरोना संक्रमित कर्मचार्‍यांना आइसोलेट केले आहे. आणि त्यांच्यावर नजरही ठेवली जात आहे. कंपनीने सांगितले की, कर्मचार्‍यांनी कोरोनापासून वाचण्यासाठी सोशल डिस्टेंसिंगच्या नियमांचे पालन करावे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here