महाराष्ट्रात १५४ साखर कारखान्यांचे गाळप संपुष्टात

118

पुणे : महाराष्ट्रातील गाळप हंगाम आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. राज्यात आतापर्यंत १९ एप्रिल २०२१ अखेर १५४ साखर कारखाने बंद झाले आहेत.

साखर आयुक्तालयाने दिलेल्या माहितीनुसार, १९ एप्रिल २०२१ अखेरपर्यंत १९० साखर कारखान्यांनी गाळप हंगामात सहभाग घेतला. राज्यात ९९९.५० लाख टन उसाचे गाळप झाले असून १०४७.५० लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा १०.४८ टक्के आहे.

साखर आयुक्तालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, सोलापूर विभागातील ४३ कारखाने बंद झाले आहेत. तर कोल्हापूर विभागातील ३७ कारखाने बंद झाले आहेत. नांदेड विभागातील २३ कारखान्यांचे गाळप संपुष्टात आले असून पुणे विभागातील २४ कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील ऊस संपला आहे. अहमदनगरमधील १३ कारखाने बंद झाले असून औरंगाबादमधील १० तर अमरावतीमधील २ कारखाने बंद झाले आहेत. नागपूर विभागातील २ साखर कारखाने बंद झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here