आपल्या घरी परतणार्‍या साखर कारखान्याच्या कामगारांच्या मिनी बसला अपघात

108

संभल/गवा: सायकलस्वार प्रवासी अचानक बसच्या दिशेने आला, त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात बस पालटली. जपुरा थाना क्षेत्रातील गवा बबराला मार्गावर मिनी बसला अपघात झाला. यामध्ये साखर कारखान्यामध्ये काम करणार्‍या 13 काश्मिरी मजूरांसह 16 लोक जखमी झाले. या दुर्घटनेनंतर गोंधळ माजला, घटनास्थळी जमलेल्या लोकांनी पोलीसांना सूचना दिली. जखमींना बुलंदशहर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

रजपुरा साखर कारखान्यामध्ये मजुरी करणारे काश्मिरचे 13 लोक मिनी बसमध्ये दिल्लीसाठी रवाना झाले होते. बस टी पॉईंट चौकीजवळ आल्यानंतर अचानकपणे एक सायकलस्वार बसच्या समोर आला. तेव्हा त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात बस चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि अनियंत्रित होवून बस पलटी झाली. या अपघातात बसचालक गुरमीत सिंह, गगनदीप सिंह, मोहम्मद युसुफ, अद्बुल लतीफ, मुस्ताक अहमद जखमी झाले आहेत. इतर 11 लोक किरकोळ जखमी झाले आहेत. या अपघातामध्ये जखमी सायकलस्वार मजूर दिल्लीहून बदायूं ला जात होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here