राज्यामध्ये १७ साखर कारखान्यांनी गाळप थांबवले 

187

पुणे: महापूर व दुष्काळामुळे तसेच राजकीय अस्थिररतेमुळे राज्याचा गाळप हंगाम यंदा उशिरा सुरु झाला. काही विभागामध्ये तर या वर्षीचा हंगाम हा खूप कमी चालला गेला. परंतु महापूर येऊन देखील कोल्हापूर विभागाने आपले स्थान अबाधित राखले आहे. काही कारखान्यांनी गाळप हंगाम १५ दिवसापासून ते ६० दिवसापर्यंतच घेतला. बहुतांशी साखर कारखाने म्हणावे तसे चाललेच नाहीत.

साखर आयुक्तालयाच्या अहवाल नुसार कोल्हापूर विभागातील सर्व कारखाने सुरु आहेत. पुणे विभागातील २, अहमदनगर विभागातील ३, सोलापूर विभागातील २, औरंगाबाद विभागात सर्वात जास्त १० कारखान्यांनी आपले गाळप थांबवले आहे.

२३ फेब्रुवारी २०२० अखेर एकूण ४३४.५५ लाख मेट्रिक टन ऊस गाळप झाले असून, १०. ९८ टक्के साखर उताऱ्यासह ४७७.३४ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. राज्यामध्ये खाजगी  ६६ आणि सहकारी ७८ असे मिवून १४४ कारखान्यांनी गाळपात सहभाग नोंदवला होता त्या पैकी एकूण १७ साखर कारखान्यांनी आपले गाळप थांबवले आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here