साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांचे 17,134 करोड़ रुपये देय

123

नवी दिल्ली : कोरोनाच संकट असून साखर कारखान्यांनी गाळप सुरु ठेवले आहे, जेणेकरून ऊस शेतकऱ्यांचे कोणतेही नुकसान होऊ नये. तसेच त्यांची साखर विक्री ठप्प झाल्याने उत्पन्नाची ची समस्या निर्माण झाली आहे आणि ते ऊसाचे पैसे देण्यात अपयशी ठरले आहेत.

केंद्रीय खाद्य मंत्रालयाच्या अनुसार, 2019-20 हंगामात आतापर्यंत ऊस थकबाकी 17,134 करोड़ रुपयांपर्यंत पोचली आहे. केंद्रीय खाद्य मंत्रालयाच्या आकड्यानुसार कारखान्यांनी 2019-20 हंगामात 28 मे पर्यंत 64,261 करोड़ रुपयाच्या एकूण रकमेपैकी 47,127 करोड़ रुपये बाकी आहेत. एकूण ऊस थकबाकी 17,134 करोड़ रुपये इतकी आहे.

ऊस (नियंत्रण) आदेश, 1966 अंतर्गत ऊस पुरवठयानंतर 14 दिवसांच्या आत शेतकऱ्यांना ऊसाचे पैसे भागवणे साखर कारखान्यांसाठी आवश्यक आहे. जर कारखाने पैसे भागवण्यात अपयशी ठरले, तर त्यांना प्रति वर्षी 15 टक्के व्याज दराने हे पैसे भागवावे लागतील.

2017-18 गाणि 2018-19 हंगामात अतिरिक्त साखर उत्पादनामुळे साखरेच्या किमतीत घट झाल्याने कारखान्यांच्या खेळत्या भांडवलावर प्रतिकूल परिणाम झाला, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या ऊसाचे पैसे देण्यात कारखाने अपयशी ठरले.

कोरोनामुळे साखर उद्योगावर मोठा परिणाम झाला आहे. देशव्यापी लॉकडाउनमुळे घरगुती आणि जागतिक बाजारात साखर विक्री ठप्प आहे, ज्याचा थेट परिणाम कारखान्याच्या उत्पन्नावर वर दिसून येत आहे. आइसक्रीम, कोल्डड्रिंक आणि चॉकलेट सारख्या विविध प्रकाराच्या उत्पादनांच्या निर्मात्यांकडून औद्योगिक वापरासाठी मागणीत घट झाल्याने साखर विक्री ठप्प आहे. याशिवाय साखरेच्या उप उत्पादनांची विक्री ही मंदावली आहे. मार्च आणि एप्रिल मध्ये साखरेची विक्री लॉकडाऊन मुळे एक मिलियन टन कमी होती. साखर विक्री न झाल्याने साखर कारखान्यां समोर ऊसाचे पैसे भागवण्याची चिंता आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here