नियम न पाळणाऱ्या 18 साखर कारखान्यांना परवानगीची प्रतीक्षा

कोल्हापूर : नियमांचे उल्लंघन करणे, एफआरपी तटवणे, सरकारी देणी देण्यास टाळाटाळ करणे आदी कारणांसह साखर आयुक्त कार्यालयाने कोल्हापूर विभागातील १८ साखर कारखान्यांचे गाळप परवाने रखडले आहेत. साखर हंगामाच्या तोंडावर परवाने थांबलेल्या या कारखान्यांना साखर आयुक्तांनी 13 नोव्हेंबरला म्हणणे मांडण्यास सांगितले आहे.

दरवर्षी एक नोव्हेंबरला राज्यातील साखर हंगाम सुरू होतो, पण यंदा महापुरामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. कोल्हापूर विभागातील कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतील ४५ लाख मेट्रिक टनाला फटका महापूराने बसण्याची शक्यता आहे. परतीच्या पावसाने साखर हंगामाच्या वेळापत्रकाचे गणित बिघडवले आहे.

परतीच्या पावसाने शेतात पाणी असल्याने हंगाम नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होण्याची शक्यता आहे. तरीही साखर आयुक्त कार्यालयाने कारखान्यांना गाळप परवाना देण्यासाठी ऑनलाइन प्रक्रिया सुरू केली आहे. कोल्हापूर विभागात ३७ साखर कारखाने असून, कोल्हापूर जिल्ह्यात २२, तर सांगली जिल्ह्यात १५ कारखाने आहेत. बहुतांश कारखान्यांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर बॉयलर प्रदीपन केले आहे. हंगाम सुरू करण्यासाठी परवाने मागितले असून, त्याप्रमाणे माहिती दिली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ११, तर सांगली जिल्ह्यातील ७ कारखाने अशा १२ कारखान्यांचा परवाना पेंडिंग ठेवण्यात आला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील केन ऍग्रो, शरद कारखाना- नरंदे, गायकवाड कारखाना- बांबवडे, रिलाएबल शुगर- फराळे, सदाशिवराव मंडलिक कारखाना, आप्पासाहेब नलवडे- गडहिंग्लज, पंचगंगा साखर कारखाना, कुंभी-कासारी- वारणा, आजरा कारखाना, दौलत साखर कारखाना- हलकर्णी, सांगली जिल्ह्यातील राजारामबापू पाटील- कारंडवाडी, सोनहिरा कारखाना- वांगी, महांकाली कारखाना, यशवंत शुगर, माणगंगा आणि तासगाव या साखर कारखान्यांची गाळप परवाना प्रक्रिया पेंडिंग ठेवली आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here