गेल्या सात वर्षात भारतात डिजिटल व्यवहारात १९ टक्क्यांची वाढ : पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी देशभरातील युपीआय सुविधांचे कौतुक करताना सांगितले की, गेल्या सात वर्षात भारतात डिजिटल व्यवहारांत १९ क्क्यांची वाढ झाली आहे. अत्यंत कमी कालावधीत भारत हा डिजिटल व्यवहारांत जगात अग्रेसर बनला आहे. आमच्या बँकींग प्रणालीने २४ तास सुविधा देण्यास सुरुवात केल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय रिझर्व्ह बँकेच्यावतीने (आरबीआय) लाँच करण्यात आलेल्या ग्राहक केंद्रीय योजनांवर आधारित कार्यक्रमात ही माहिती दिली.

कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, गेल्या काही वर्षापर्यंत बँकिंग, विमा आणि पेन्शनसारख्या सुविधांचा फायदा देशातील काही खास आणि कमी लोकांना मइळत होता. देशातील सर्वसामान्य नागरिक, गरीब कुटुंबे, शेतकरी, छोटे व्यावसायिका, व्यापारी, महिला, दलित, वंचित, मागास वर्गासाठी ही सुविधा उपलब्ध होऊ शकत नव्हती. यासोबतच बँकिंगच्या क्षेत्रात शाखांची कमतरता, कर्मचाऱ्यांची कमतरता आणि इंटरनेट कनेक्शनसारख्या त्रुटी अस्तित्वात होत्या. गरीब आणि सर्वसामान्य नागरिकांसाठीच्या या सुविधांवर आधी लक्ष देण्यात आले नव्हते, असे पंतप्रधानांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here