अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील 19 एसटी मार्ग बंद – राज्य परिवहन विभाग नियंत्रक रोहन पलंगे

कोल्हापूर, ता. 5 : अतिवृष्टीमुळे कोल्हापूर- गगनबावडा, गडहिंग्लज -नांगनुर, गडहिंग्जल-ऐनापूर, गडहिंग्जल-कोवाड, गडहिंग्लज-नूल, चंदगड-आजरा, चंदगड-बेळगाव, चंदगड-पारगड, चंदगड-इब्राहिमपूर, चंदगड-कूरणे/भूजवडे, कुरूंदवाड-बस्तवाड, कुरूंदवाड-दानोळी कवठेसार, कागल-बस्तवडे, कागल-बानगे, राधानगरी-कारीवडे, गगनबावडा-कोल्हापूर, आजरा-चंदगड, आजरा-खेटवडे या एकोणीस मार्गावरील एसटी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे, अशी माहिती परिवहन विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांनी दिली.

कोल्हापूर -रत्नागिरी मार्गावर केर्ली रस्त्यावर पाणी आल्याने वाठार बोरपाडळेमार्गे पर्यायी मार्ग चालू आहे. कोल्हापूर -राजापूर मार्ग पर्यायी पाली मार्गे चालू. कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर मांडुकली/बालिंगा पुलावर पाणी आल्याने मार्ग पुर्णत: बंद. कोल्हापूर-राधानगरी मार्गावर हळदी रस्त्यावर पाणी आल्याने कुर्डु शेळेवाडी मार्गे वाहतूक सुरू.

संभाजीनगर-बाचणी रस्त्यावर पाणी आल्याने गिरगांव मार्गे वाहतूक सुरू. इचलकरंजी-कागल मार्गावर माणकापूर येथे पाणी आल्याने पर्यायी पाच मैल मार्गे वाहतूक सुरू. इचलकरंजी-नृसिंहवाडी मार्गावर शिरढोण पुलावर पाणी आल्याने शिरढोण पर्यंत वाहतूक सुरू. इचलकरंजी-कागल रस्त्यावर पाणी आल्याने हुपरीपर्यंत वाहतूक सुरू. इचलकरंजी-कुरूंदवाड मार्गावर लाट हेरवाड पुलावर पाणी आल्याने पाच मैल मार्गे वाहतूक सुरू.

गडहिंग्लज-चंदगड मार्गावर भडगाव पुलावर पाणी आल्याने पर्यायी आजरामार्गे वाहतूक सुरू. गारगोटी-किल्ला-पाल-मार्गावरील वाहतूक पर्यायी मालवाडी मार्गे सुरू. गारगोटी-मॉन्टी एम.आय.डी.सी. मार्गावर बानगेजवळ पाणी आल्याने पर्यायी निपाणी मार्गे सुरू. गारगोटी-इस्पुर्ली मार्गावर बाचणी पुलावर पाणी आल्याने पर्यायी मुदाळ तिट्टी मार्गे वाहतूक सुरू.

मलकापूर-गावडी मार्गावर अनुस्कुरा जवळ पाणी आल्याने अंशत: बंद. मलकापूर-कोल्हापूर रस्त्यावर केर्ली रस्त्यावर पाणी आल्याने वाठार-बोरपाडी मार्गे वाहतूक सुरू. कुरूंदवाड-लाट हेरवाड मार्गावर हेरवाड पुलावर पाणी आल्याने पाच मैल मार्गे वाहतूक सुरू. कुरूंदवाड-टाकळी दानवाड मार्गावर दानवाड ओढ्यावर पाणी आल्याने वाहतूक दत्तवाड मार्गे सुरू. कुरूंदवाड-शिरोळ धरणगुत्ती मार्गावर धरणगुत्ती रस्त्यावर पाणी आल्याने इचलकरंजी/जयसिंगपूर मार्गे वाहतूक सुरू. कुरूंदवाड-अकिवाट राजापूर मार्गावर राजापूर पुलावर पाणी आल्याने अकिवाट टाकळी मार्गे वाहतूक सुरू.

कागल-इचलकरंजी मार्गावर माणकापूर येथे पाणी आल्याने हुपरीपर्यंत वाहतूक सुरू. राधानगरी- राशिवडे मार्गावर पिरळ पुलावर पाणी आल्याने शिरोली मार्गे वाहतूक सुरू. गगनबावडा- कोल्हापूर मार्गावर मांडुकली रत्यावर पाणी आल्याने मार्ग पुर्णत: बंद तसेच गगनबावडा-कोल्हापूर मार्गावर लोंघे गावाजवळ पाणी आल्याने मार्ग पुर्णत: बंद. आजरा पेरणोली मार्गावर सुलगाव येथे पाणी आल्याने सोहाळे मार्गे वाहतूक सुरू.

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here