नवी दिल्ली : देशाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला. सरकारने यावेळी २० कोटी घरांवर राष्ट्रध्वज फडकावण्याचे उद्दीष्ट ठेवले होते. गेल्या ७५ वर्षात देशाने अनेक उतार-चढाव पाहिले आहेत. या ७५ वर्षात देशाने प्रगती साधली आहे. प्रचंड अडचणी असतानाही भारताने गतीने आर्थिक विकास साधला आहे. आता ५ ट्रिलियन भारतीय अर्थव्यवस्थेची चर्चा सुरू आहे. अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर १९४७ मधील पेट्रोल-डिझेल, साखर आदी वस्तूंच्या दराबाबत चर्चा केली जात आहे.
मनीकंट्रोल डॉट कॉमवरील वृत्तानुसार, १९४७ मध्ये, आजपासून ७५ वर्षांपूर्वी पेट्रोलची किंमत २७ पैसे प्रती लिटर इतकी होती. तर आज दिल्लीत पेट्रोलचा दर ९६.७२ रुपये प्रती लिटर आहे. तर साखरेची किंमत ४० पैसे प्रती किलो होते. आज साखरेची किंमत ३८ ते ४० रुपये किलो आहे. या काळात लोकसंख्येतही गतीने वाढ होत आहे.