फिलीपाइन्समध्ये २.१ मिलियन मेट्रिक टन कच्च्या साखरेचे उत्पादन शक्य

मनिला : युनायटेड स्टेट्स डिपार्टमेंट ऑफ अॅग्रीकल्चरने (यूएसडीए) सांगितले की, फिलिपाइन्समध्ये सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या २०२१-२२ या हंगामात कच्च्या साखरेचे उत्पादन २.१ मिलियन मेट्रिक टनापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

यूएसडीएने विदेशी कृषी सेवा विभागाला दिलेल्या एका अहवालानुसार पिकांचे घटलेले उत्पादन आणि प्रतिकूल वातावरणामुळे उत्पादन जैसे थे राहण्याची शक्यता आहे. उत्पादन मर्यादीत करणाऱ्या घटकांमध्ये घटलेले ऊस क्षेत्र आणि नेग्रोस बेटाबाहेरीतल भागातील कमी उत्पादकता या कारणांचा समावेस आहे. हवामान बदलामुळे दुष्काळाची अधिक शक्यता आहे. तर अतिवृष्टीचा उत्पादनावर विपरित परिणाम होणार आहे. काही ऊस उत्पादक अधिक उत्पन्न देणाऱ्या पिकांकडे वळण्याची शक्यता आहे. त्याचा थेट परिणाम साखर कारखान्यांवर होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here