कोविडच्या दुसऱ्या लाटेमुळे २ लाख कोटींचे नुकसान, तिसऱ्या लाटेचीही शक्यता

नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला आतापर्यंत दोन लाख कोटी रुपयांचा फटका बसला आहे. राज्यांच्या स्तरावर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे वस्तूंच्या मागणीवर विपरित परिणाम झाला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने हा नुकसानीचा अंदाज व्यक्त केला आहे. बुधवारी आयबीआयने जारी केलेल्या आपल्या अहवालात नुकसानाची सविस्तर आढावा घेतला आहे. कोरोनावरील लस हा मोठा शोध आहे. मात्र, फक्त लसीकरणाने या महामारीपासून बचाव करणे शक्य नाही. कोरोनासह जगण्याची आपल्याला सवय लावून घ्यावी लागेल. सरकारने आरोग्य सुविधा आणि दळणवळण क्षेत्रात अधिक गुंतवणूक करण्यास प्राधान्य द्यायला हवे असे आरबीआयने म्हटले आहे.

अहवालात म्हटले आहे की चालू आर्थिक वर्षात विकास दर १०.५ टक्क्यांवरुन घटून ९.५ टक्क्यांवर आल्याने अर्थव्यवस्थेचे आतापर्यंत दोन लाख कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. ग्रामीण आणि छोट्या शहरांतील मागणीवर झालेला परिणाम यास कारणीभूत आहे. महागाईची चिंता अधिक भेडसावणार आहे. मात्र, तरीही व्याज दराबाबत कडक धोरण ठेवले जाणार नाही. गेल्यावर्षी लागू केलेल्या देशव्यापी लॉकडाऊनच्या तुलनेत यंदा कमी नुकसान आहे. औद्योगिक उत्पादन आणि निर्यातीच्या स्तरावर सकारात्मक बाबी आहेत. देशाच्या अर्थव्यवस्थेत गतीने वाढण्याची क्षमता आहे असे आरबीआयने म्हटले आहे.

मात्र, तिसऱ्या लाटेची शक्यता अधिक आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगबरोबरच लसीकरणाची गरज आहे असेही आरबीआयने बजावले आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here