उत्तर प्रदेश: ऊस उत्पादकांसाठी खुशखबर; ऊसाच्या दोन नव्या प्रजाती वाढवणार शेतकऱ्यांचा गोडवा

लखनौ : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्थानासाठी साखर उद्योग तथा ऊस विकास विभाग सदैव कार्यरत आहे. या अंतर्गत ऊस आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात ऊस आयुक्त संजय भुसरेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली ‘बियाणे ऊस तथा ऊस प्रजाती स्वीकृती उपसमिती’ची बैठक आयोजित करण्यात आली होती. या उपसमितीमध्ये राज्यातील ऊस उत्पादक शेतकरी तथा साखर कारखानेही सदस्य आहेत. या बैठकीत व्हरायटी रिलिज कमिटीकडून राज्यातील शेतकऱ्यांसाठी २ नव्या प्रजातींचे, कोसी १७२३१ आणि यूपी १४२३४ चे सादरीकरण करण्यात आले.

ऊस बीज तथा ऊस प्रजाती स्वीकृती उपसमितीसमोर ऊस संशोधन परिषदेच्या वैज्ञानिकांनी प्रस्तावित नव्या प्रजातीच्या विविध ठिकाणी परिक्षणानंतर तसेच विविध साखर कारखान्यांमध्ये केलेल्या राज्यस्तरीय परिक्षणाचे निष्कर्ष, उसाच्या रसाची टक्केवारी, प्रती हेक्टरी उत्पादन आदी आकडेवारी सादर केली. या दोन्ही नव्या प्रजातींचे, को ०२३८ आणि कोसी ७६७ या वाणांच्या तुलनेत उत्पादकतेचे विवरण सादर केले. उपलब्ध आकडेवारीवर उपसमितीच्या सदस्यांनी विचार-विनिमय करून आपली मते, सूचना सादर केल्या.

अध्यक्ष तथा ऊस आयुक्त संजय भुसरेड्डी यांनी सादर झालेल्या आकडेवारीचे अवलोकन करून सर्वसंमत्तीने ऊसाची प्रजाती कोसी १७२३१ आणि यूपी १४२३४ ला राज्यात लागवडीसाठी स्वीकारली. त्यांनी सांगितले की, या प्रजातीच्या उसाची लागवड करून उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होण्यासह साखरेच्या उताऱ्यातही वाढ होईल. राज्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी नव्या प्रजातीच्या वाणाचा पर्याय आणि नव्या प्रजातीचे बियाणे उपलब्ध होईल. ऊसाची प्रजाती यूपी १४२३४ ही ज्या ठिकाणी उसाचे उत्पादन कमी येते अथवा ज्या क्षेत्रात सध्या उसाची लागवड केलेली नाही, अशा ठिकाणांसाठी खूप लाभदायक असल्याचे दिसून येईल. तर कोसी १७२३१ ही प्रजाती उसात पाणी साठण्याचा प्रकार तसेच कारखान्याला उत्पादनासाठी लागणाऱ्या योग्य संख्येतील काड्यांची पूर्तता करेल. यासोबतच याचे खोडवा उत्पादन क्षमताही अधिक आहे.
यासोबतच या बैठकीत ऊसाच्या कोपीके ०५१९१ या प्रजातीला लाल सड रोगाचा फैलाव होत असल्याने ती काढून टाकण्याचाही निर्णय झाला. गळीत हंगाम २०२२-२३ मध्ये या प्रजातीची खरेदी केली जाईल. मात्र, २०२३-२४ मध्ये फक्त खोडवा उसाची लागवड ग्राह्य असेल. या हंगामात शेतकऱ्यांसाठी हे वाण नव्या लागवडीसाठी प्रतिबंधीत असेल असा निर्णय घेण्यात आला.

व्हरायटी कमिटीच्या या बैठकीत अपर गन्ना आयुक्त (विकास)/संचालक, उ. प्र. ऊस संशोधन परिषद शाहजहाँपूर, व्ही. के. शुक्ल, संयुक्त ऊस आयुक्त डॉ. व्ही. बी. सिंह, डॉ. आर. सी. पाठक तसेच विश्वेश कनौजिया यांसह ऊस संशोधन परिषद, शाहजहांपूर आणि भारतीय ऊस संशोधन संस्था लखनौच्या वरिष्ठ वैज्ञानिकांसह साखर कारखान्यांचे प्रतिनिधी, प्रगतीशिल शेतकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here