पंजाबच्या गरीब गरजूंना शुगरफेड देणार 20 लाख किलो साखर

117

चंदीगढ : पंजाबचे सहकार मंत्री एस सुखजिंदर सिंह रंधावा यांनी सांगितले की, शुगरफेड कडून कोरोना महामारीपासून वाचण्यासाठी करण्यात आलेल्या लॉक डाउन दरम्यान गरीब गरजूंना 2० लाख किलो साखर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यापैकी 50,000 किलो साखर यापूर्वीच वाटण्यात आली आहे.

रंधावा म्हणाले, मुख्यमंत्री कैप्टन अमरिंदर सिंह यांच्या सुचनेनुसार कोरोना च्या संकटावेळी लोकांच्या त्यांच्या सुरक्षेसाठी घरात राहण्यासाठी गरीब आणि गरजूंना रेशन उपलब्ध करण्यासाठी सर्व आवश्यक गोष्टी केलेल्या आहेत. ते म्हणाले, ही जबाबदारी खाद्य नागरीक पुरवठा विभागावर सोपवण्यात आली आहे. तसेच शुगर फेड कडून एक किलो साखरेचे २० लाख पॅकेट उपलब्ध केले जातील. रविवारी 50,000 पॅकेट पाठवले आहेत आणि येणाऱ्या दिवसात उर्वरीत पॅकेटही पाठवली जातील. ते म्हणाले, या आवश्यक वस्तूची उपलब्धता निश्चित करणे आणि याचा काळाबाजार पूर्णपणे रोखण्यासाठी प्रयत्न करू.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here