श्रीलंकेत देशाची साखरेची २० टक्के गरज भागविणाऱ्या प्रोजेक्टसाठी २०० हेक्टर जमीन मंजूर

श्रीलंकेतील मंत्र्यांच्या कॅबिनेटने वॉवनिया उत्तर विभागीय सचिवालयात वनीकरण विभागाशी संबंधीत २०० हेक्टर वन जमीन सुटेक शुगर इंडस्ट्रिजला (Sutech Sugar Industries) लीजवर देण्यास मंजुरी दिली आहे. ग्रीनफिल्ड शुगर डेव्हलपमेंट प्रोजेक्ट अंतर्गत गुंतवणूकीस प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने राष्ट्रपतींद्वारे सादर करण्यास आलेल्या प्रस्तावास मान्यता मिळाली आहे. याचा वापर ऊस शेती आणि साखर उत्पादनासाठी केला जाईल.

थालयंडच्या सुटेक इंजिनीअरिंग कंपनी या योजनेसाठी ४०० मिलियन अमेरिकन डॉलरची गुंतवणूक करणार आहे. यातून देशातील साखरेच्या गरजेपैकी जवळपास २० टक्के उत्पादन होईल अशी अपेक्षा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here