साखर कारखान्यांना प्रतिटन उसामागे २०० रुपये अनुदान

1869

 

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

पुणे : चीनी मंडी

साखर कारखान्यांना साखरेची निर्यात, वाहतूक, राखीव साठा आदींसाठी प्रतिटन उसाला  २०० ते २२५ रुपये अनुदान देणार आहे. केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाचे सचिव  रविकांत यांनी ही माहिती दिली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, खासदार राजू शेट्टी यांनी रविकांत यांची दिल्लीमध्ये भेट घेतली. त्यावेळी रविकांत यांनी ही माहिती दिली आहे. त्यामुळे साखर कारखान्यांकडे पैसे येणार असून, एफआरपी मिळण्याती अडथळा दूर झाला आहे.

यंदा ऊस गाळप हंगाम आर्थिक अडचणीत आहे. यंदा राज्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांची थकीत ‘एफआरपी’ ५ हजार कोटी रुपयांवर गेली आहे. देशातील बाजारात साखरेला उठाव नाही, तर आंतरराष्ट्रीय बाजारात दर नाही. त्यामुळे कारखाने आर्थिक संकटात होते. ऊस उत्पादकांची देणी थकल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने याप्रकरणी आंदोलन तीव्र केले. त्यानंतर साखर कारखान्यांवर जप्तीची कारवाई सुरू झाली. भीती पोटी कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यांवर पहिला हप्ता २३०० रुपये जमा करण्यास सुरुवात केली. स्वाभिमानीने उर्वरीत एफआरपी पोटी साखर देण्याची मागणी केली ती देखील कारखान्यांनी मान्य केली आहे.

या सगळ्या पार्श्वभूमीवर खासदार शेट्टी यांनी एफआरपीचा तिढा सुटावा यासाठी नवी दिल्ली येथे रविकांत यांची भेट घेतली. त्यावेळी रविकांत म्हणाले की,  कारखान्याने केंद्र सरकारच्या अटींची पूर्तता केली असेल तर संबंधित साखर कारखान्यांना अनुदान मिळेल. ‘एफआरपी’ची थकबाकी राहिली असेल तर ती भागवण्याच्या करण्याच्या अटीवर अनुदानाची रक्कम मिळेल. साखर कारखान्यांनी अटी पूर्ण कराव्यात, त्यांना त्वरित अनुदान दिले जाईल. अडचणी वाटत असतील अशा कारखान्यांनी थेट आमच्या विभागाशी संपर्क साधावा, असेही सचिव रविकांत यांनी स्पष्ट केले.

डाउनलोड करा चीनीमंडी न्यूज ॲप:  http://bit.ly/ChiniMandiApp  

SOURCEChiniMandi

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here